Wednesday, June 30, 2021

नाम:स्मरण

 नाम:स्मरण


नाम हे केव्हाही , कुठेही कोण्याही ठिकाणी घेता येते. त्याला कोणतेही बंधन नाही..म्हटलेच आहे: -


अहो येता जाता , उठता बसता कार्य करता

सदा देता घेता वदनी वदता ग्रास गिळता

घरी दारी शय्येवरी बहु सुखाचे अवसरी

*समस्यांची लज्जा त्यजुनी भगवचिंतन करी *

दत्तगुरूंच्या पादुकांचे महत्त्व


दत्तगुरूंच्या पादुकांचे महत्त्व


श्रीनृसिंह सरस्वती महाराजांच्या मूळ-पादुका तीन ठिकाणी आहेत. संन्यास घेऊन ते जेव्हा घराबाहेर पडले, तेव्हा प्रथमत: ते औदुंबर येथे आले. तेथे त्यांनी पहिला चातुर्मास करून अनुष्ठानाला प्रारंभ केला. तेथे त्यांनी आपल्या पादुका ठेवल्या. त्या पादुकांना ‘विमलपादुका’ असे म्हटले जाते. विमल म्हणजे स्वच्छ, निर्मळ, शुद्ध असा भावार्थ होतो. म्हणजेच येथील अनुष्ठानापासूनच त्यांनी आपल्या स्वत:साठी नव्हे, पण आम्हाला-तुम्हाला तेथील अनुष्ठानाचे महत्त्व कळावे यासाठी उपासनेतील शुद्ध, निर्मळ, स्वच्छ अशा अंतर्मनाचे स्वरूप त्यातून सूचित केले असावे. कारण अनुष्ठानासाठी सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट हीच असते. उपासनेची प्रगती ही अशा मनोधारणेतून होत असते. पुढे श्रीनृसिंहसरस्वती महाराज हे नरसोबाची वाडी येथे गेले. तेथे त्यांनी बारा वर्षे तप केले. तेथील पादुकांना ‘मनोहरपादुका’ असे म्हटले गेले आहे. का म्हणाल? तर तपश्चर्येने प्राप्त होणारी प्रसन्नता तिथे अभिप्रेत असावी. जेव्हा तपश्चर्या किंवा अनुष्ठान हे अधिकाधिक काळ होते, तेव्हा ही मनाची किंवा चित्ताची प्रसन्नता मुखावर विलसत असते. दत्तगुरूंचे हे प्रसन्न दर्शन घडून येऊन आपलेही मन प्रसन्न होते. ही प्रसन्नता आनंदस्वरूपही असते. त्याचे आणखीही एक कारण असे की, स्वत: श्रीगुरूंनी सांगितले की,

गुरु कशाला हवा ?

गुरु कशाला हवा ?


व्यवहारात सुद्धा आपल्याला गुरू करावा लागतो, तर त्याच्यापेक्षा अवघड ज्ञान होण्यासाठी गुरू नको असे म्हणून कसे चालेल ? 


प्रपंचात सुखदुःख झाले, समाधान मिळाले नाही, तर मग खरे सुख कुठे आहे आणि ते मला कोण दाखवील, अशी ज्याला तळमळ लागेल तोच गुरू करील. 

प्रपंच आम्हाला कडू वाटला तरच शिष्य होण्याचा प्रश्न.

 शिकावे असे ज्याच्या मनात येते तो शिष्य, आणि जो शिकवितो तो गुरू. मला काही कळत नाही असे ज्याला वाटतो तोच गुरू करील. 

श्री दत्तात्रेय स्तोत्र



||श्री दत्तात्रेय स्तोत्र||


हे स्तोत्र अतिशय दिव्य असून श्रीदत्तात्रेयांचे साक्षात् दर्शन करविणारे आहे.  हे स्तोत्र श्रीनारदपुराणातील असुन हे स्वतः श्रीनारदमुनींनीच रचले आहे.


नारदमुनींच्या नामस्मरणाबाबत आपण सर्वच जाणून आहोत . सतत भगवान नारायणाच्या नामाचा नामघोष करीत नारद मुनींनी वैकुंठाचे कायम सदस्यपद आणि भगवंताच्या हृदयात प्रवेश मिळविला. भगवान दत्तात्रेय हेच भगवान विष्णू असून यांच्या नानारूपधर ख्यातीची

*दत्त कवच*

 *दत्त कवच*

*श्रीदत्तात्रेयवज्रकवचम्‌*

धर्म, अर्थ, काम व मोक्ष देणारे हेच श्रेष्ठ स्तोत्र आहे. तसेच हत्ती, घोडे, रथ, पायदळ इत्यादी सर्व प्रकारचे ऎश्वर्य देणारे आहे.

Sunday, June 27, 2021

🚩गुरुचरित्र अध्याय पहिला

 🌹 *गुरुचरित्र* *भाषांतरित*🌹

*अध्याय* *पहिला*

   🌹llओम ओमकारा गुरुदेव दत्तll🌹 

Saturday, June 26, 2021

*संकटनाशन गणपती स्तोत्र

 *संकटनाशन गणपती स्तोत्र*


प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम्

भक्तावासं स्मरेनित्यम आयुष्कामार्थ सिध्दये ॥१॥


प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम्

तृतीयं कृष्णपिङगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम ॥२॥

पहाटेची_अमर्याद_ताकद

 # पहाटेची_अमर्याद_ताकद ...💪💪💪 तुम्ही सकाळी किती वाजता उठता?   झोपायला कितीही उशीर झाला तरी, तरी रोज पहाटे लवकर उठायला हवं! मोठी माणसं सा...