Monday, July 5, 2021

।। *तारक मंत्र।*।

 🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻


।। *तारक मंत्र।*। 


*निःशंक हो निर्भय हो मना रे । प्रचंड स्वामी बळपाठीशी रे ।अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी ।अशक्यहि शक्य करतील स्वामी।।१।।*


 *जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय । स्वये भक्त प्रारब्ध घडवी हि माय । आज्ञेविना काळ न नेई त्याला ।परलोकीही न भीती तयाला।।२।।* 


*उगाची भितोसी भय हे पळू दे ।जवळी उभी स्वामी शक्ति कळू दे । जगी जन्म मृत्यु असेखेळ ज्यांचा । नको घाबरू तू असे बाळ त्यांचा।।३।।*


*खरा होई जागा श्रद्धेसहित । कसा होशी त्याविण रेस्वामी भक्त । कितीदा दिला बोल त्यांनीच हात ।नको डगमगू स्वामी देतील साथ।।४।।*


*विभूति नमन नाम ध्यानां दे तीर्थ । स्वामीच या पंचप्राणामृतात । हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती । न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती।।५।।*


*🙏🏻|| श्री स्वामी समर्थ ||🙏🏻*


🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹

No comments:

Post a Comment

पहाटेची_अमर्याद_ताकद

 # पहाटेची_अमर्याद_ताकद ...💪💪💪 तुम्ही सकाळी किती वाजता उठता?   झोपायला कितीही उशीर झाला तरी, तरी रोज पहाटे लवकर उठायला हवं! मोठी माणसं सा...