🙏श्रीस्वामीसमर्थ🙏
🌹🌹 स्वामी प्रभात 🌹🌹
लंबोदरा तुझा शोभे शुंडादंड । करीतसे खंड दुश्चिन्हांचा ॥१॥
चतुर्थ आयुधें शोभताती हातीं । भक्ताला रक्षिती निरंतर ॥२॥
भव्यरूप तुझें उंदीरवाहना । नमन चरणा करीतसें ॥३॥
तुझें नाम घेतां दोष जळताती । कळिकाळ कांपती तुझ्या नामें ॥४॥
चौदा विद्या तुझे कृपेनें येतील । मुके बोलतील वेदघोष ॥५॥
रूणझुण पायीं वाजताती वाळे । ऐकोनी भुललें मन माझें ॥६॥
भक्तवत्सला ऐकें पार्वतीनंदना । नमन चरणां करितसें ॥७॥
नामा ह्मणे आतां देईं मज स्फूर्ती । वर्णितसें कीर्ति कृष्णजीची ॥८॥
🙏🌹 ॐ गं गणपतये नमः 🌹🙏
No comments:
Post a Comment