Thursday, July 29, 2021

पहाटेची_अमर्याद_ताकद

 #पहाटेची_अमर्याद_ताकद...💪💪💪


तुम्ही सकाळी किती वाजता उठता?

 

झोपायला कितीही उशीर झाला तरी, तरी रोज पहाटे लवकर उठायला हवं!


मोठी माणसं सांगायची,

“लवकर निजे, लवकर उठे, त्यास आयु-आरोग्य लाभे !”

आणि ते खरं आहे, 


#हेल एरॉल्ड नावाचं एक जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे, ते एक प्रचंड यशस्वी व्यावसायीक होते, मोठ्या जिद्दीने त्यांनी एका अपघातामुळे आलेल्या शारिरीक विकलांगतेवर मात केली होती.


पण २००८ च्या महामंदीत त्यांचा प्रचंड लॉस झाला, अब्जोपती हेल कर्जबाजारी झाला.


पण तो हार मानणारा नव्हता, यातून बाहेर कसं पडावं, हे विचारण्यासाठी तो आपल्या एका यशस्वी मित्राकडे गेला, मित्राने त्याला काय सल्ला दिला असेल बरं?


“हेल, तु सकाळी लवकर उठ!” “बाकी सगळं आपोआप होईल”

या चमत्कारिक सल्ल्याने हेल निराश झाला, त्याला काहीतरी आगळेवेगळे उपाय अपेक्षित होते, 

काही दिवस त्याने कसेबसे ढकलले, पण दिवसेंदिवस निराशा त्याला घेरत होती, मग नाईलाज म्हणुन त्याने सकाळी चार वाजता उठायची सुरुवात केली,


आणि हेल सांगतो, त्याचं आयुष्यच बदलुन गेलं!


पहाट आणि सुर्योदय इतके जादुई असतात का?


इतक्या सकाळी उठुन काय करावं? ह्या प्रश्नावर हेल ने एक कोडवर्ड सांगितलाय.


#"S-A-V-E-R-S"


ह्या आयुष्य बदलुन टाकणार्‍या सहा सवयी आहेत.


१) Silence – (ध्यान)


- शांत बसुन स्वतःच्या आत डोकावणे, म्हणजे ध्यान!


- स्वतःच्या आतल्या चेतनेला स्पर्श करणे, म्हणजे ध्यान!


- मनाच्या कॉम्पुटरला फॉर्मेट करुन व्हायरस रिमुव्ह करणे म्हणजे ध्यान!


- मन प्रफुल्लीत आणि ताजतवानं करण्यासाठी आवश्यक असते ध्यान!


- माणसाच्या गरजा किती कमी आहेत, आणि सगळ्या चिंता किती व्यर्थ आहेत याची आत्मप्रचिती म्हणजे ध्यान!


- अफाट, अदभुत आणि आनंददायी विश्वशक्तीसोबत स्वतःला जोडून घेणे, आणि स्वतःच्या मन-शरीराचा कणकण प्रफुल्लित करवुन घेण्याची कृती म्हणजे ध्यान! 


२) Affirmations – (सकरात्मक स्वयंसूचना)


- अफरमेशन्स म्हणजे स्वसंवाद!


- स्वतः स्वतःला सुचना देणं,


- प्रचंड शक्तिशाली असलेल्या अंतर्मनावर आपण निश्चित केलेलं ध्येय कोरणं!

- येत्या पाच वर्षात, येत्या एक वर्षात, पुढच्या एका महिन्यात, पुढच्या एका आठवड्यात, आणि आज दिवस भर मी काय काय करणार आहे, याचं मनातल्या मनात पुन्हा पुन्हा रिव्हीजन करणे म्हणजे स्वयंसूचना!


- स्वयंसुचनांमुळे कल्पना खोल अंतर्मनात झिरपतात, आणि नाटकीयरित्या सत्यातही उतरतात.


- अंतर्मनाची शक्ती प्रचंड असल्यामुळे तिथे रुजलेला प्रत्येक विचार मग तो चांगला असो की वाईट, खराच होतो.


- आपले पूर्वज म्हणायचे, शुभ बोल नाऱ्या!..किंवा जिभेवर सरस्वती असते, आपण बोलु तसेच घडते, जिभेवरचे देवता तथास्तु म्हणते, वगैरे वगैरे 


- या सगळ्या अंधश्रद्धा नव्हत्या, ह्यामागे मनोविज्ञान आहे.


- एखादी गोष्ट हजारो वेळा बोलली तर ती अंतर्मनात प्रक्षेपित होते, मग अशुभ कशाला बोलायचे?


- वाईट बोलुन विनाशाला आमंत्रण देण्यापेक्षा, ‘या सुखांनो या’!... 


३) Visualize – (चांगल्या कल्पना मनात घोळवणे.)


तीव्र इच्छा पुर्ण झाली आहे, अशी मनातून कल्पना करणं, ती पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त करणं आणि मनःपटला वर तिला बारीक सारीक रुपात साकारणं, म्हणजे व्हिज्वलायजेशन!


 कल्पनाशक्ती ही निसर्गाने माणसाला दिलेली सर्वात अनमोल आणि सर्वात प्रभावशाली भेट आहे.


- कल्पनाशक्तीचा योग्य वापर केल्यास साधारण माणसाचं यशस्वी व्यक्तीमध्ये रुपांतर होतं.


- दररोज आपण आपली ध्येयं पूर्ण झाली आहेत, असं मनात घोळवलं पाहीजे.


- पोहण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदकांची रास उभी करणारा मायकेल फेल्प्स म्हणतो. ज्यावेळी मला झोप येऊ लागते, तेव्हा मला जे नक्की करायचे आहे, ते मनातल्या मनात बघण्याचा मी प्रयत्न करतो.


- ऑलंपिकविजेती एथलिट लेन बीचले म्हणाली होती, मागचे चार वर्ष मी एकच निकाल डोळ्यापुढे आणत होते, ते म्हणजे, मी हातात विजेतापदक घेऊन उभी आहे, आणि माझ्यावर शॅंपेनचा वर्षाव होत आहे. 


- मायकेस स्मिथ म्हणाला, मी मला हवे असलेल्या स्वप्नाचे रेखाचित्र कागदावर रेखाटतो, स्वप्नांबद्द्ल टिपण लिहतो, आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्याला डोळ्यांसमोर उभे करतो.


- प्रसिद्ध उद्योगपती अझीम प्रेमजींना त्यांच्या यशाचे रहस्य विचारले तर ते म्हणाले, “यश दोनदा मिळते, एकदा मनात आणि दुसऱ्यांदा वास्तव जगात!”


४) Exercise – (व्यायाम)


- शरीरातून आळसाला पळवून  लावण्यासाठी, शरीरातील उर्जा वाहती ठेवण्यासाठी, मनाने कणखर आणि आनंदी राहण्यासाठी आवश्यक असतो, व्यायाम!


- शरीर आळसावलं की मन भ्रष्ट झालंच समजा!


- व्यायाम, योगासने, प्राणायाम यांच्या माध्यमातून उर्जेला वळण न दिल्यास ती अतिरिक्त मैथुनाकडे वळते, आणि माणूस वासनांचा गुलाम बनतो.


- वाईट सवयींचा गुलाम झालेल्या माणसातले चैतन्य हरपते, अशा व्यक्तीला एकाकी असल्याची जाणीव अस्वस्थ करते.  


- तो कशावरच एकाग्र होवू शकत नाही, आणि म्हणून तो आनंदी होवू शकत नाही, मनात एक अनामिक भय तयार होते.


- ह्या सगळ्या दुष्ट श्रंखलेला तोडण्याचा एकच उपाय, तो म्हणजे, व्यायाम करा, डिप्स मारा, सूर्यनमस्कार घाला, पुलअप्स करा, ट्रेडमिलवर घाम गाळा,प्राणायाम करा. 


- शरीरातले चैतन्य जिवंत ठेवा.


५) Reading – (वाचन)


 पुस्तकं वाचणारी माणसं एका आयुष्यात अनेक आयुष्य जगतात.


- पुढच्याच ठेस, मागचा शहाणा, ह्या न्यायाने दुसर्‍यांच्या अनुभवाने शहाणे होणारे लोक जगावर राज्य करतात.


वॉरेन बफे, बिल गेटस, मार्क जुकरबर्ग हे सगळे आठवड्याला दोन पुस्तके वाचून पूर्ण करतात.


६) Scribing – (लिहिणे.)


- माझे ठाम मत आहे, की माझ्या आयुष्यातल्या खडतर काळात मी जर लिहीत राहीलो नसतो तर मी आज जिवंत राहीलो नसतो.


 लिहिल्याने तुमची तुमच्याशी नव्याने भेट होते.


- लिहिल्याने मन रिकामे होते, दुःख नाहीसे होते, मनात नव्या उर्जेचा संचार होतो.


- लिहल्याने नवे रस्ते उघडतात, नव्या प्रगतीच्या वाटा खुलतात.


- म्हणून संतानी सांगून ठेवले आहे, दिसामाजी काहीतरी लिहीत जावे.


लिहणं, हे सुद्धा स्वसंवादाचं प्रभावी साधन आहे.लिहिल्याने विचार पक्के होतात.


 सकाळी उठल्यावर आज दिवस भर मी काय करणार आहे, ते लिहावं,


- एखादी समस्या छळत असेल तर ती लिहून त्याचे उपाय लिहावेत,


- मनाला स्वप्नांच्या आकाशात मुक्त पणे पाठवून कागदावर स्वप्ने रेखाटावीत.


- ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मी काय काय करणार आहे, त्याचं प्लानिंग, नियोजनही लिहावं,


- आणि रोज स्वतःला कामे नेमून द्यावीत, आणि पूर्ण झाली की स्वतःला विजयी घोषित करावं.


लिहिल्यानं मन मोकळं होतं, चिंतांचं ओझं हलकं हलकं होतं!


- जवळच्या व्यक्तीला पत्रं लिहावीत, कधी प्रेरणादायक किस्से कहाण्या लिहाव्यात.


- अशाने अंतरंग फुलुन येतात, उर्जेचा स्रोत खळखळत वाहतो.


ह्या सहा सवयींपैकी प्रत्येक सवय आयुष्य बदलून टाकणारी आहे.


 🙏🙏

Monday, July 26, 2021

नमस्काराचे महत्व



●● नमस्काराचे महत्व ●●


● महाभारताचे युद्ध सुरु होते. 

   दररोज कौरवसेनेचे  मोठमोठे योद्धे

   मारले जात होते. पितामह भिष्मांसारखे

   ज्येष्ठ योद्धे कौरवांच्या बाजूने असून 

   देखील त्यांच्या सेनेची सतत हानी 

   होत होती..

Tuesday, July 20, 2021

धार्मिक कार्यात नेहमी लागणारी माहिती ॥*

 

*॥ धार्मिक कार्यात नेहमी लागणारी माहिती ॥*


*1) पंचामृत :- दूध, दही, तूप, मध, साखर.*


*2) पंचगव्य:- गोमुत्र, गोमय (गाईचे शेण) दूध, दही, तूप.*

Saturday, July 17, 2021

।। श्री नारायण स्तोत्रम् ।।

 ❄❄❄❄❄🏵️❄❄❄❄❄

   ।। श्री नारायण स्तोत्रम् ।।


*खालील "नारायण स्तोत्राचे" नियमित पाठ केल्याने सर्व प्रकारच्या बाधा, पीडा, दोष, शाप तसेच अरिष्ट दुर होवुन मनोवांच्छित प्राप्त होते.*

Monday, July 12, 2021

प्राणायाम

 *प्राणायाम*

    सुचना व इशारे

*आसन*

१२. शीतली आणि शीतकारे सोडल्यास प्राणायाम फक्त नाकातून करावयाचा असतो.

१३. सतरंजीची घडी जमिनीवर ठेवून तिच्यावर बसून प्राणायाम करणे सर्वात चांगले. सिध्दासन, वीरासन, पद्मासन आणि बध्दकोणासन ही आसने प्राणायामाला अनुकूल आहेत. कण्याच्या पायथ्यापासून मानेपर्यंतची पाठ पूर्णपणे ताठ आणि जमिनीशी काटकोनात राहाणार असेल तर बसून करण्याची इतर आसनेही चालतील. काही प्रकार मात्र पुढे वर्णिल्याप्रमाणे निजून करता येतील.

१४. प्राणायाम करताना चेहर्‍याचे स्नायू, डोळे, कान किंवा मानेचे स्नायू, खांदे, हात, मांडया अगर पावले यांमध्ये कोणत्याही प्रकारचा ताण जाणवता कामा नये मांडया व हात आवर्जून सैल सोडावे, कारण प्राणायाम करताना ते अजाणता तंग बनतात.

१५. जीभ निश्चेष्ट ठेवा, नाहीतर तोंडात लाळ जमा होईल. झाली तर ती रेचकापूर्वी गिळून टाका. कुंभक करताना गिळू नका.

१६. पूरक आणि कुंभक करताना बरगडयांचा पिंजरा पुढच्या व बाजूच्या दिशांना फुगला पाहिजे; पण खांद्यांची पाती व बगला यांच्या खालचा भाग मात्र फक्त पुढच्या दिशेने फुगावा.

१७. सुरुवातीला घाम येईल आणि कंप सुटेल; पण कालांतराने ही लक्षणे दिसत नाहीशी होतील.

१८. बसून करावयाच्या सर्व प्राणायाम प्रकारामध्ये मानेच्या तळापासून पुढले डोके ओढंगलेले असावे, व हनुवटी गळपट्टीच्या हाडांमध्ये व उरोस्थीच्या वरील खोबणीत विसावलेली असावी. हा हनुवटीचा बंध किंवा जालंधरबंध, यापुढे वर्णिलेल्या पध्दतीत जेथे स्पष्टपणे वर्ज्य केला असेल अशा वेळा सोडून, इतर सर्व वेळी अनुसरावा.

**दक्षिणावर्ती (उजवा) शंख*

  **दक्षिणावर्ती (उजवा) शंख* 


ज्या शंखाचा पृष्ठभाग स्वत:कडे करून देवाकडे त्याचे अग्र केले म्हणजे त्याच्या पन्हाळीची पोकळी उजव्या बाजूला येते असा शंख म्हणजे दक्षिणावर्ती (उजवा) शंख. दक्षिणावर्ती शंख दुर्मिळ असल्याने त्याच्या किमती अधिक असतात

Monday, July 5, 2021

**पांडूरंगाची माळ घालणे म्हणजे काय

 **पांडूरंगाची माळ घालणे  म्हणजे काय* ?




*पांडूरंगाची माळ म्हणजे मुळात कोणतीही साधारण  गोष्ट नाही.*


 #🙏संत महंत *पांडूरंगाची माळ म्हणजे वरिष्ठांच्या प्रती आदरभाव असणे.*


*पांडूरंगाची माळ म्हणजेच कनिष्ठांच्या प्रती करुणाभाव बाळगणे.* 


*पांडूरंगाची माळ म्हणजे आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये असं वागण.*


 *पांडूरंगाची माळ म्हणजे वेद वाचण्यापेक्षा वेदना वाचता येणे.* 


*पांडूरंगाची माळ म्हणजे आपलं काम प्रामाणिकपणे करणं.*


*पांडूरंगाची माळ म्हणजे आपलं कौटुंबीक आणि सामाजिक कर्तव्य पार पाडणं.*


*पांडूरंगाची माळ म्हणजे मुक्या प्राण्यांवर, पशु-पक्ष्यांवर प्रेम करणे.*


*पांडूरंगाची माळ म्हणजे निरपेक्ष सत्कर्म करत रहाणे.*

काकड आरती

 *💥🌞काकड आरती🌞💥*

*ओवाळीतो काकड आरती !*

*स्वमिसमार्था तुज प्रती !!*

*ओवाळीतो काकड आरती !*

*मन*

 🌹 *मन* 🌹



प्रश्न : मन म्हणजे काय ?

उत्तर : मन हे वायुस्वरूपी आहे. वायूच्या गतीत आंदोलने आहेत, म्हणून त्या वायूलाच मन म्हटले आहे. नाहीतर मन म्हणून स्वतंत्र काही नाही, मन नावाचा पदार्थ नाही.

चारधाम

 ❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄

               चारधाम 


*आपल्या आयुष्यात एकदाच घडणारी चार धाम तीर्थयात्राही एक लांब, अवघड आणि तितकीच लाभदायी यात्रा आहे. हरिद्वार हे रेल्वे स्थानक येथून सर्वात जवळ असल्याने, लोक यमुनेत्रीपर्यंत यात्रा करतात, जेथे कोणत्याही कार्याची सुरुवात यमुना नदीत डुबकी घेऊन केलीजाते. तेथून भाविक गंगोत्रीला जातात आणि त्यांनतर केदारनाथ आणि शेवटी बद्रीनाथला जातात. या संपूर्ण यात्रेदरम्यान,भाविक विविध पौराणिक मंदिरांमध्ये पूजा करतात आणि मोहक, अविस्मरणीय अशा यात्रा मार्गाचा प्रवास करतानास्वतःला शुद्ध करतात.*

*कोणार्क सूर्य मंदिर*

 ----------------------------

*कोणार्क सूर्य मंदिर*

------------------------------


कोणार्क हा शब्द 'कोण"' आणि 'अर्क' या शब्दाच्या जोड्याने बनलेला आहे. अर्कचा अर्थ सूर्य आहे, तर कोन म्हणजे काठ अथवा कोपरा असावा. 

अन्नपूर्णेचे महत्त्व.

 🙏💛अन्नपूर्णेचे महत्त्व.......


 ही पोस्ट अन्नपूर्णा जयंती निमित्त रिपोस्ट केली आहे अन्नपूर्णा जयंतीच्या आपणास हार्दिक शुभेच्छा 

*तुळशी*

 *तुळशी*


पद्म पुराणामध्ये उत्तराखंडात तुळशीचे महात्म्य भगवान शंकरांनी स्वतःच्या मुखाने नारदांना सांगितलेले आहे , ते अत्यंत श्रेष्ठ असून, तुळशी आणि तिची सेवा ह्याचे महत्व सांगितले आहे. त्यांनी सांगितलं की जो मनुष्य तुळशीची सेवा करतो, तो खऱ्या अर्थाने भाग्यवान असतो . तुळशीची पानं, फुलं, फळ ,मूळ शाखा, इतकच काय तर तुळशीची माती सुद्धा सर्वकाही पावन आहे. तुळशीचे महत्व सांगत असताना आम्हाला अनेक प्रकारातून शंकर भगवान महत्त्व सांगतात

*झाडूला लक्ष्मीचे प्रतिक मानले जाते,*

 ---------------------------------------------------

*झाडूला लक्ष्मीचे प्रतिक मानले जाते,*

------------------------------------------------


*जाणून घ्या, झाडूशी संबंधित काही खास गोष्टी.*


 अनेक वेळा आपण काही वस्तू साधारण समजून वापरत असतो पण वास्तवात त्या आपल्या जीवनात फार महत्वाची भूमिका पार पाडत असतात. त्यांचे शुभ-अशुभ जीवनात मोठा बदल घडवू शकतात. 

।। *तारक मंत्र।*।

 🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻


।। *तारक मंत्र।*। 


*निःशंक हो निर्भय हो मना रे । प्रचंड स्वामी बळपाठीशी रे ।अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी ।अशक्यहि शक्य करतील स्वामी।।१।।*

गुरुविण कोण दाखवील वाट....

 🌺 *गुरुविण कोण दाखवील वाट....!* 🌺

*मागील जन्माची पुण्याई असेल तर योग्य वेळी सदगुरु* *आपणास आपोआप भेटतात..!  काहींना त्रास होतो. माणसाचे भोग संपत आले कि, सद्गुरूंचा पत्ता मिळतो..! काहींना* *अगोदर मिळतो, कारण* *त्यांचे मागील जन्माची* *पुण्याई असते..!  काहींना जाणीव पूर्वक मिळतो. तर* *काहींना* *अपघाताने 

🔥 *शेज आरती* 🔥

 🔥 *शेज आरती* 🔥 


                 

*आतां स्वामी सुखें निद्रा करा अवधुता ।*

*स्वामी अवधुता ।*

*चिन्मय, सुखधामी जाऊनी, पहुडा एकांता ।।*

*वैराग्याचा कुंचा घेऊनी चौक झाडीला ।*

*गुरु हा चौक झाडीला ।।

Saturday, July 3, 2021

मारुतीची प्रार्थना

 🌹🌹 स्वामी प्रभात 🌹🌹


 🚩 *मारुतीची प्रार्थना* 🙏


नारायणी पर्वती अंजनीने तप केले।

भोळ्या शंकरे वरदान दिधले।

स्वयं रुद्र प्रकटले संतान होऊनी।

Friday, July 2, 2021

England 2-0 Germany | Match 43 | Highlights | UEFA Euro 2020

The English fans were busy chanting 'It's Coming Home' at the Wembley Stadium as England managed to defeat Germany in a 2-0 encounter. After a largely action-less game, England's first breakthrough came in the 75th minute. It was Raheem Sterling who knocked Luke Shaw's ball in the back of the net. Thomas Muller missed a golden opportunity to take his side on level terms and give the Germans a ray of hope. Skipper Harry Kane joined the party as well as he opened his Euro 2020 account with a goal in the 86th minute to put German hopes in a well. Jack Grealish assisted Kane's goal. The match ended 2-0 to England.

Croatia 3-5 Spain EURO 2020 match 41 Highlights

Highlights of 41st match between Croatia and Spain in EURO 2020

Click here to watch

swami samarth

पहाटेची_अमर्याद_ताकद

 # पहाटेची_अमर्याद_ताकद ...💪💪💪 तुम्ही सकाळी किती वाजता उठता?   झोपायला कितीही उशीर झाला तरी, तरी रोज पहाटे लवकर उठायला हवं! मोठी माणसं सा...