Monday, July 5, 2021

चारधाम

 ❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄

               चारधाम 


*आपल्या आयुष्यात एकदाच घडणारी चार धाम तीर्थयात्राही एक लांब, अवघड आणि तितकीच लाभदायी यात्रा आहे. हरिद्वार हे रेल्वे स्थानक येथून सर्वात जवळ असल्याने, लोक यमुनेत्रीपर्यंत यात्रा करतात, जेथे कोणत्याही कार्याची सुरुवात यमुना नदीत डुबकी घेऊन केलीजाते. तेथून भाविक गंगोत्रीला जातात आणि त्यांनतर केदारनाथ आणि शेवटी बद्रीनाथला जातात. या संपूर्ण यात्रेदरम्यान,भाविक विविध पौराणिक मंदिरांमध्ये पूजा करतात आणि मोहक, अविस्मरणीय अशा यात्रा मार्गाचा प्रवास करतानास्वतःला शुद्ध करतात.*


*🔹धाम १: गंगोत्री*


*गंगोत्री उत्तरकाशी जिल्ह्यात वसले आहे, गंगोत्रीचा भूभाग ताज्या पाण्याच्या प्रवाहाने आणि सभोवतालच्या हिरवळीने नटलेला आहे. हिंदू मान्यतेप्रमाणे हे गंगा नदीचे उगमस्थान आहे. गंगोत्रीतून पाणी बद्रीनाथ आणि केदारनाथला आणले जाते जे आपल्याचार धाम यात्रेतीलपुढचे थांबे आहेत. येथे तुम्ही गंगोत्री मंदिराला भेट देऊ शकता, गंगनाणी – दुखणे बरे करण्याचा गुणधर्म असलेले गरम पाण्याचे कुंड, येथील पाण्यात बुडालेले असेशिवलिंग आहे जिथे गंगा देवता इतर धार्मिक स्थळांच्याही आधी प्रथमच पृथ्वीवर अवतरली.*


*🔹धाम २ : यमुनोत्री*


*यमुना देवतेला समर्पित असलेले हे एक पवित्र शहर आहे. अशी मान्यता आहे की यमुना नदीचा उगमइथल्या कालिंदी पर्वतामध्ये झाला होता. यमुनोत्रीला जाण्यासाठी, भाविकांना जानकीचट्टी पासून थोडी चढाई करावी लागते. मात्र, तुम्ही खेचरावर बसून किंवा पालखीत बसून प्रवास करूनहे सर्व टाळू शकता. या दोन्ही मार्गे सुमारे 500 – 1000 रुपये खर्च येतो. येथील मुख्य मंदिराला भेट देण्याबरोबरच, तुम्ही सूर्य कुंड, सप्तऋषी कुंड आणि जानकी चट्टीला भेट देऊ शकता, जे ट्रेकिंगसाठीचे एक मुख्य केंद्र आहे.*


*🔹धाम ३: केदारनाथ.*


*केदारनाथ हे रुद्रप्रयागपासून 86 कि.मी. अंतरावर गुप्तकाशीमध्ये आहे. येथे जाण्यासाठी नैसर्गिक सुंदरतेने नटलेल्या पर्वतांमधून, गवताळ प्रदेशातून, उष्ण भागातून, अप्रतिम पर्वतशिखरांपासून आणि हिरवळीतून जाणाऱ्या मार्गे तुम्हालायात्रा करून जाता येते. भगवान शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगापैकी हे एक महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे. केदारनाथमध्ये तुम्ही भैरव मंदिर आणि महापंथ – एक उच्च सतोपंथ जो स्वर्गात जाण्याचा एक मार्ग आहे असे मानले जाते, अशा या दोन ठिकाणांना भेट देऊ शकता. तेथे केदारनाथ वन्यजीव अभयारण्य देखील आहे, जे दुर्मिळ वनस्पती आणि वन्यजीवांनी समृद्ध आहे.*


*केदारनाथ यात्रेसाठी नोंदणी.* *केदारनाथ यात्रेसाठी पूर्व-नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी स्वतः नोंदणी केंद्रावर जाऊन किंवा ऑनलाईन केली जाऊ शकते. तुम्हाला एक यात्रा कार्ड दिले जाईल जे संपूर्ण यात्रेदरम्यान जवळ बाळगणे अत्यंत महत्वाचे आहे.*


*वैद्यकीय प्रमाणपत्र.*

*जर तुम्हालागुप्तकाशी आणि सोनप्रयागमध्ये असलेल्या वैद्यकीय केंद्रातून वैद्यकीय स्वास्थ्य प्रमाणपत्र मिळाले तरच तुम्ही ही यात्राकरू शकता. जर वैद्यकीय प्रमाणपत्रात असे काहीनमूद केले असेल की जेणेकरून तुम्हाला चढाई करण्यास धोका आहे, तरी देखील तुम्ही हेलिकॉप्टरद्वारे केदारनाथला पोहोचू शकता.*


*🔹धाम ४ : बद्रीनाथ.*


*हे गढवाल हिमालयाच्या मध्यभागी वसलेले आहे, या पवित्र नगराला भेट देण्यासाठी तुम्हाला विशेष परवानगीची आवश्यकता असते. तुम्ही या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी कार भाड्याने घेऊ शकता, बद्रीनाथमध्ये सर्व कार्सना काही ठराविक वेळेपुरतीच परवानगी आहे (सकाळी ६-७, सकाळी ९-१०, सकाळी ११-१२, दुपारी २-३ आणि दुपारी ४.३०-५.३०) मात्र, जर तुम्हाला रांगेमध्ये उभे राहण्याचा कंटाळा आला असेल आणि चटकन दर्शन घ्यायचे असेल तर गेट क्र. ३ जवळील तिकीट काउंटरवर पोहोचा आणि वेद पाठ पूजेसाठीची पावती करा. याचा खर्च प्रतिव्यक्ती २५०० रुपये होतो आणि १५ मिनिटांत दर्शन घडते.*





❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄

No comments:

Post a Comment

पहाटेची_अमर्याद_ताकद

 # पहाटेची_अमर्याद_ताकद ...💪💪💪 तुम्ही सकाळी किती वाजता उठता?   झोपायला कितीही उशीर झाला तरी, तरी रोज पहाटे लवकर उठायला हवं! मोठी माणसं सा...