----------------------------
*कोणार्क सूर्य मंदिर*
------------------------------
कोणार्क हा शब्द 'कोण"' आणि 'अर्क' या शब्दाच्या जोड्याने बनलेला आहे. अर्कचा अर्थ सूर्य आहे, तर कोन म्हणजे काठ अथवा कोपरा असावा.
सदर कोनार्क सूर्य-मंदिर लाल वाळूचा खडक आणि काळ्या ग्रॅनाइट दगडांनी बनविलेले आहे. हे गंगा वंशीय राजा नरसिंहदेव यांनी इ.स.पू. १२३६ ते १२६४ या काळात बांधले होते. हे मंदिर भारतातील सर्वात प्रसिद्ध स्थळांपैकी एक आहे.
*१९८४ मध्ये हे युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केले आहे.*
कलिंग शैलीत बांधलेले हे मंदिर, सूर्य देवाचा (अर्क) रथ म्हणून प्रसिद्ध आहे. दगडांवर कोरीव नक्षीकाम केलेले आहे. संपूर्ण मंदिराची जागा सात घोड्यांनी खेचलेल्या बारा चक्रांनी बनविली आहे, ज्यामध्ये सूर्यदेव बसलेला आहे. पण सध्या सातपैकी फक्त एक घोडा शिल्लक आहे. या बारा चक्रांची वर्षाच्या बारा महिन्यांसारखी रचना केली आहे आणि प्रत्येक चक्र आठ बाणांनी बनलेले आहे, जे दिवसाच्या आठ प्रहरांचे प्रतिनिधित्व करते. स्थानिक लोक या सूर्य देवाला बिरांची-नारायण असे म्हणतात.
मुख्य मंदिर तीन मंडपांमध्ये बांधले गेले आहे. यातील दोन मंडप कोसळले आहेत. मूर्ती असलेल्या तिसर्या मंडपात, ब्रिटीशांनी स्वातंत्र्यापूर्वी वाळू आणि दगड भरले होते आणि मंदिराला आणखी नुकसान होऊ नये म्हणून सर्व दरवाजे कायमस्वरुपी बंद केले होते. मंदिरात सूर्य देवाच्या तीन मूर्ती आहेत:
*बालपण दर्शवणारा सूर्य - ८ फूट*
*युवावस्थेतील-सूर्य - ९.५ फूट*
*प्रौढावस्थेतील ढळलेला - ३.५. फूट*
त्याच्या प्रवेशद्वारावर, दोन सिंह हत्तींवर आक्रमण करण्याच्या तयारीत सज्ज असल्याचे दर्शविलेले आहेत. मंदिराच्या दक्षिणेकडील भागात दोन सुसज्ज घोडे आहेत, जे ओडिशा सरकारने त्याचे प्रतीक म्हणून स्वीकारले आहेत. ते १० फूट लांब आणि ४ फूट रुंदीचे आहेत. मंदिरात सूर्य देवाचा भव्य प्रवास दर्शविला जातो.
त्याच्या प्रवेशद्वारावर एक नट मंदिर आहे. हे असे स्थान आहे जेथे मंदिरातील नर्तक सूर्यदेवाला अर्पित करण्यासाठी नाचत असत. संपूर्ण मंदिरात फुलांची घंटा आणि भूमितीय नमुन्यांची कोरीव कामं आहेत. या बरोबरच मानव, देवता, गंधर्व, नपुंसक इत्यादीही मुद्रांमध्ये दर्शविलेले आहेत.
मंदिर आता अर्धवट अवशेषांमध्ये रूपांतरित झाले आहे. येथील पुरातत्व सर्वेक्षण संस्थेच्या सूर्य मंदिर संग्रहालयात येथील कलाकृतींचा संग्रह जतन केलेला आहे. थोर कवी आणि नाटककार रवींद्र नाथ टागोर यांनी या मंदिराबद्दल लिहिले आहे: - कोनार्क, जिथे दगडांची भाषा माणसाच्या भाषेपेक्षा श्रेष्ठ आहे.
-🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
No comments:
Post a Comment