Thursday, June 10, 2021

स्वामी कथा

🙏🏼श्री स्वामी समर्थ🙏🏼 


🙏🏼स्वामी कथा🙏🏼

अरे !!   लठ्ठ्या.. बघतोस काय..  ह्या महापुरात उडी मार.. आणि  पलीकडे जावून नौका घेऊन ये..  मी तुझ्या


पाठीशी आहे..!!


|| स्वामी लीला ||

स्वामी सगुण रुपात अक्कलकोट नगरीत असंख्य लीला करत होते..परिसरातील गावात जिथे जमेल तिथे स्वामींचा दरबार भरत असत..कधी कधी स्वामी काही निवडक निष्ठावंत भक्तांना सोबत घेऊन परिसरातील गावात जात..असेच एक दिवस स्वामी काही निष्ठावंत भक्तांना घेऊन मणूर नावाच्या गावात आले..हे गाव चंद्रभागेच्या तीरावर वसलेले आहे..त्या वेळेला पावसाचे दिवस होते..मुसळधार पाउस सुरु होता...चंद्रभागेला महापूर आला होता..दुपारची वेळ झाली होती..तेव्हा चोळप्पा बोलला कि “स्वामी ह्या गावात जेवणाची सोय काहीच नाही , आपण काय करायचे !!” तेव्हा स्वामी बोलले “ अरे चोळ्या..नदीच्या पलीकडे सोय केलेली आहे..!!” चोळप्पा बोलला “पण स्वामी नदीला महापूर आलेला आहे..नौका पण पलीकडच्या तीरावर आहे..आपण पलीकडे जायचे कसे..!!” स्वामी बोलले..”अरे चोळ्या ..हा माझा लाडका लठ्ठ्या आहे ना !!” स्वामी त्यांच्या श्रीपादभट नावाच्या भक्ताला लठ्ठ्या ह्या नावानेहाक मारीत..तेव्हा स्वामी बोलले “ अरे !! लठ्ठ्या.. बघतोस काय..ह्या महापुरात उडी मार..आणि पलीकडे जावून नौका घेऊन ये..मी ¬तुझ्या पाठीशी आहे..!! ” तो श्रीपाद भट ने क्षणाचा विचार न करता ..धोतर कमरेला खोचून चंद्रभागेच्या महापुरात बेधडक उडी मारली.. श्रीपाद भट नदीत पोहत होता..स्वामी त्याच्याकडे अतिशय वात्सल्याने एकटक करून पहात होते..

 तो अचानक श्रीपाद भटच्या उजव्या पायाला मगरीने पकडले..श्रीपाद भट खूपच घाबरला..आणि श्री स्वामी समर्थ मंत्राचा मोठ्याने जप करू लागला...मगरीने पाय अतिशय घट्ट पकडला होता..मगर काही पाय सोडायला तयार नव्हती..तो इकडे करुणाघन दयाळू स्वामींनी आपला उजव्या पायाला जोरात झटका दिला..तोच तिकडे मगरीने पाय सोडला... अहाहा !! स्वामी भक्तो हो ..कशी हि स्वामींची लीला..!! श्रीपाद भटचा पाय मगरीने सोडताच ते काही वेळातच पलीकडच्या किना-यावर पोहचतात..¬नावाड्याला सोबत घेऊन नौका घेऊन येतात.. श्रीपाद भट अतिशय थकलेला होता..स्वामीनी त्याला जवळ घेतले..डोक्यावरून मायेचा हात फिरवला..तो श्रीपाद भटांच्या डोळ्यातून पाणी सुरु झाले..तेव्हा स्वामी बोलले..”अरे लठ्ठ्या ..तुला जेव्हा मगरीने पकडले..तेव्हा काय वाटले रे बाबा..!!” तेव्हा श्रीपादभट बोलले..”स्वामी राया..!! तूम्ही माझ्या पाठीशी आहात..मग मला कसली भीती..!!! ”

 पुढे..स्वामी नौकेत बसून पैलतीरावर निघाले..तो जात असतांना तीच मगर पुन्हा दिसली..तर स्वामी तिच्या कडे बघून बोलले..”जा तू आता मुक्त होशील..” तोच आश्चर्य घडले आणि मगरीने स्वामीं समोर प्राण सोडला..!!¬ असो..स्वामींच्या लीला स्वामिंनाच ठावूक.. पलीकडील गावात गेल्यानंतर सर्वांना स्वामिलीलेचे आश्चर्यच वाटले..त्या गावातही महामारीची साथ आली होती..दररोज 4 ते 5 लोकांचा मृत्यू होत असे..परंतु त्या गावाला स्वामींचे चरण होताच महामारीची साथ निघून गेली..असो.

धन्य आहात स्वामी !! धन्य तुमचे अनन्य भक्त श्रीपाद भट !!

धन्यवाद स्वामी ! कोटी कोटी धन्यवाद स्वामी !!

🌹स्वामीगुरूमाऊली🌹🙏🏼


No comments:

Post a Comment

पहाटेची_अमर्याद_ताकद

 # पहाटेची_अमर्याद_ताकद ...💪💪💪 तुम्ही सकाळी किती वाजता उठता?   झोपायला कितीही उशीर झाला तरी, तरी रोज पहाटे लवकर उठायला हवं! मोठी माणसं सा...